योग,फिटनेस आणि आत्मविश्वास

दादर - तुम्ही बारीक असाल किंवा शरीर लवचिक असेल तर योगा करणं सोपं जातं.... हा आपला समज. या दृढ समजाला तडा दिलाय, 33 वर्षांच्या डॉली सिंगनं. ती सध्या प्रसार माध्यमांतच कार्यरत आहे. योगा करताना कुठेही शॉर्टकट न घेणाऱ्या डॉलीच्या हालचाली अतिशय लयबद्ध असतात. त्या पाहताना कुणीही आश्चर्यचकित होईल.

नियमित योगा करून डॉलीनं आत्मविश्वास वाढवलाय. ज्या महिलांचं वजन जास्त आहे, ज्या महिला व्यायाम आणि योगापासून लांब पळतात आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस आणखी कमी होत जातो, त्यांच्यासाठी डॉली हे उत्तम उदाहरण आहे. ती अगदी ठामपणे सांगते की, ज्या महिलांचं वजन जास्त आहे त्यांनी जरूर योगा करावा. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल आणि आत्मविश्वासही वाढेल.

पुढील बातमी
इतर बातम्या