इको फ्रेंडली दुर्गा माता

शिवाजी पार्क - नवरात्रौत्सव काही दिवसांंवर आल्याने देवीच्या मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांची सध्या लगबग सुरू आहे. मात्र मोठमोठ्या आणि पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी पार्क जवळच्या चित्रशाळेतील बंगाली कलाकारांचे काम आरामात सुरू आहे. येथे गेल्या 40 वर्षाँपासून पर्यावरणपूरक देवीच्या मूर्ती घडवल्या जात आहे.

या चित्रशाळेत गेल्या 40 वर्षांपासून पर्यावरणपूरक गवत, बांबू तसेच नदीच्या मातीचा वापर करून एक ते 17 फुटांपर्यंत उंच वजनाला हलक्या देवीच्या विविध रूपातील मूर्ती बनवण्यात येतात.

याबाबत ज्येष्ठ बंगाली मूर्तिकार उत्तम पाल म्हणाले, "नवरात्रोत्सवाला 1 तारखेपासून सुरुवात होत असली तरी आमच्याकडे अजून आठ दिवसाची वेळ शिल्लक आहे. या मूर्तींची स्थापना पंचम पासून म्हणजे नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून होईल. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मूर्तींची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील".

पुढील बातमी
इतर बातम्या