महाराष्ट्रीयन मिम्स...पोट दुखेल हसून हसून!

इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीची तरुणांना चांगलीच भुरळ पडली आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे तरुणाई सहजरीत्या विविध अॅप्लिकेशन्सचा वापर करताना दिसते. 'थोडी मजा, मस्ती चलता है रे,' असं म्हणत तरुण मंडळी हमखास मिम आणि ट्रोल्सचा वापर करतात. तुम्ही फेसबुकवर काही फोटो किंवा व्हीडिओ पाहिले असतील. फोटोजवर काही विनोदी कमेंट लिहल्या असतील किंवा व्हीडिओ असेल, तर विनोदी जोक्स टाकून डबिंग केलेलं तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याचदा यात ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, अमरिश पुरी, शक्ती कपूर यांचे फोटो किंवा त्यांच्या चित्रपटाच्या सीनचे व्हीडिओ वापरले जातात. निव्वळ गंमत म्हणून फोटो किंवा व्हीडिओचे मिम केले जातात.

पण या भन्नाट क्रिएटिव्हीटीमागे कोणाचं डोकं असतं? हा प्रश्न हमखास नेटिझन्सना पडतो. हे बनवण्याचा छंदिष्टपणा कॉलेज गोईंग तरुणांमध्ये जास्त असल्याचं पाहायला मिळतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची ओळख करून देणार आहोत, ज्यानं एक से एक भन्नाट मिम्स बनवले आहेत आणि तेही मराठीत! माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच बघा त्यानं तयार केलेले मराठी मिम!

आहे की नाही भन्नाट... कार्टून कॅरेक्टरचा वापर करुन जो संवाद किंवा संदेश डब केला जातो, त्याला ‘ट्रोल्स’ असं म्हणतात. आश्चर्य म्हणजे हा व्हीडिओ बनवणारा फक्त १८ वर्षांचा आहे. अमेय पवार असं या मुलाचं नाव असून तो चक्क बारावीत शिक्षण घेतोय! बसला ना धक्का? हे तर काहीच नाही. या पोराचं स्वत:चं फेसबुक पेज देखील आहे. www. MaharashtriansMeMe या पेजवर तुम्हाला वेगवेगळे मिम आणि ट्रोल्स पाहता येतील. त्याच्या एकाएका मिमला लाखोंच्यावर लाईक्स मिळतात.

आशिकी २ मधल्या एका सीनवरही त्यानं मिम बनवला आहे. हसून हसून पोट दुखलं, तर जबाबदार अमेय पवारच असेल बरं का? आम्ही नाही!

ढिनच्याक पूजा आणि राज ठाकरे यांचा हा व्हीडिओ तुम्ही पाहाच!

हेच पाहा ना! लिओनार्डो फक्त एकदाच महाराष्ट्रात येऊन गेला आणि थेट मराठीच्या प्रेमातच पडला!

हिंदी भाषेतील किंवा इंग्रजी भाषेतील अनेक मिम्स किंवा ट्रोल्स आपण पाहिले असतील. पण मराठी मिम्स करणारे खूप क्वचितच आढळतील. त्यापैकीच एक म्हणजे अमेय पवार!


मला मजेशीर मिम्स बनवायला फार आवडतात. खासकरुन मराठी मिम्स आणि ट्रोल्स. फेसबुकवर मी सॅवेज मिम्स हे पेज पाहिले आणि त्यातून मला महाराष्ट्रीयन मिम्स पेज सुरू करायची कल्पना सुचली. माझा मित्र मयुर शिवलकर मला एडिटिंगमध्ये मदत करतो. शिवाय त्याचाच आवाज व्हीडिओतल्या कॅरेक्टर्सना दिलाय. आम्ही केलेले मिम्स आणि ट्रोल्स लोकांना आवडत असतील तर खूप चांगलं आहे. मला त्याचा आनंदच आहे.

- अमेय पवार, संस्थापक, महाराष्ट्रीयन मेम्स

अमेय सोशल मीडियापासून खूप प्रभावित आहे. आई-बाबांची इच्छा आहे म्हणून तो शिक्षण घेतोय. सोशल मिडियाशी संबंधित क्षेत्रातच त्याला करीयर करण्याची इच्छा आहे. एवढंच नाही, तर तो गेम काढण्याच्याही विचारात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या