नवरात्री उत्सव महाविद्यालयात

माटुंगा - अनेक मोठमोठी मंडळे, घरगुती आणि इमारती चौकात आपण नवरात्री साजरा करताना पहिले असेल. परंतू नवरात्री ही माटुंगा किंग्ज सर्कलच्या 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठकरासी' म्हणजेच एसएऩडीटी महाविद्यालयात साजरी केली जात आहे. गेली अनेक वर्षे महाविद्यालायात असणाऱ्या सरस्वती मूर्तीची नवरात्रीत पूजा केली जाते. या ठिकाणी यंदाही नवरात्रीत ९ दिवस पारंपारिक पद्धतीने आरती आणि गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थांचा वेळ आणि अभ्यास वाया न घालवता सकाळी फक्त अर्धा तास आरती आणि गरब्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पूजेला दिला जाणारा प्रसाद हा शिक्षक आणि मविद्यालयातील कर्मचारी मिळून देतात. तर विद्यार्थांमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आवड निर्माण करून द्यावी यासाठी नवरात्री ही पारंपारिक पद्धतीने साजरा करत असल्याचे महाविद्यालयातील प्रमुख हीना शाहा यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या