चष्मा जचता है...

मुंबई - तुला चष्मा लावावा लागेल, असं डॉक्टरानं निदान केलं की नक्कीच तरुणाईच्या कपाळाला आठ्या पडतात. पण आता परिस्थिती बदललीय. डोळ्यांवर चष्मा आणि हातात एखादं पुस्तक घेऊन कॅम्पसमध्ये फिरलं तरी स्कॉलरटाइप म्हणून मिरवता येतं, असा आजकालच्या तरुणाईचा फंडा.

‘ये जवानी हे दिवानी’मध्ये चष्मा घातलेली दीपिका पदुकोण ते 'लव्ह यू जिंदगी'मधली आलीया या बॉलीवुड नट्या स्टाइल म्हणून चष्मा वापरतायेत. कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटिज इव्हेंट्समध्ये चष्मा चढवून वावरताना दिसतात. एकूणच चष्मा ही जगात अधिक आत्मविश्वासानं आणि ‘स्टायलिश’पणे वावरण्यासाठीचं साधन बनलंय.

चष्म्यांचं महत्त्व वाढल्यानं त्यात प्रचंड वैविध्य आलंय. कॅट आय, राउंड अशा अनेक फ्रेम्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. चष्मा ही फॅशन झाली असली तरी फ्रेम्स निवडताना काळजी घेतली पाहिजे.

-फ्रेमचा आकार आणि चेहऱ्याच्या आकारात नेहमी विरोधाभास असणं गरजेचं आहे.

-चष्म्याच्या फ्रेममध्ये काळा आणि ब्राऊन यासोबतच आकाशी, क्रीम, बिस्किट कलर, बेबी पिंक, लाइट ऑरेंज असे पेस्टल शेड्स ट्रेण्डमध्ये आहेत. अ‍ॅनिमल प्रिंटचे चष्मेसुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

-स्पोर्टी लुकमध्ये जाड फ्रेमचे, प्रामुख्यानं चौकोनी मोठ्या आकाराच्या फ्रेम्स पाहायला मिळतात. यांचे रंगही बेसिक काळा, ब्राऊन, राखाडी असे असतात.

पुढील बातमी
इतर बातम्या