सेंट्रलचा नवरा नको ग बाई!

मुंबई - रोज होणारे रेल्वेचे अपघात, दुर्घटना या मुद्द्यावरून रेल्वे प्रशासनाला कोर्ट कायम फैलावर घेत असतं. मग त्यात मध्य रेल्वे असो की पश्चिम रेल्वे. नेहमीच दोघेही कोर्टाच्या रडारवर असतात. पण यावेळी पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुली लग्नासाठी मध्य रेल्वेच्या मुलांना पसंती देत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.

रेल्वेला मुंबईची लाईफ लाईन म्हटलं जात. मुंबईची ही लाईफ लाईन मुख्यत्वे मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये विभागली गेलीय. कोलमडलेलं वेळापत्रक यामध्ये पश्चिम रेल्वे पेक्षा मध्य रेल्वे नेहमीच आघाडीवर आहे. हे कुठे ना कुठे आता कोर्टालाही कळून आलं असावं, म्हणून कोर्टानं अशा मिश्किल शब्दात 'मरे' चे कान उपटले. समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं हे मत मांडल. कारावासातील लोकांची स्थिती चांगली असेल असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या