क्राऊन बेकरी इतिहासजमा

माहीम - क्राऊन बेकरी... माहीममधली ही सुप्रसिद्ध बेकरी अखेर बंद झाली. 31 डिसेंबर 2016 ला क्राऊन बेकरीचं शटर डाउन झालं. ही बेकरी बंद होण्याचं कारण म्हणजे एमएमआरडीएचा मेट्रो 3 प्रकल्प. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो 3च्या मार्गासाठी या बेकरीला जागा रिकामी करून द्यावी लागली.

1953 मध्ये ही बेकरी सुरू झाली होती. पानी कम चहा आणि ब्रुन किंवा बन मस्का ही या बेकरीची खासियत. कामाशिवाय बसू नये हा उडुपी हॉटेलसारखा दंडक इथे कधीच नव्हता. कामाशिवायही मनसोक्त बसता येईल अशा या क्राऊन बेकरीत तासन् तास बसून अनेक जण गप्पा-टप्पा करायचे. इथले अनेक खाद्यपदार्थही जबरदस्त लोकप्रिय होते. पण 2016 या वर्षासोबतच या बेकरीनंही सध्या तरी निरोप घेतलाय. पर्यायी जागा मिळून ही बेकरी तिथे सुरू होते का, याचीच आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या