राज्यपालांच्या हस्ते 'तिचा' सन्मान

माटुंगा - विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. षण्मुखानंद सभागृहात 5 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमचं मुख्य आकर्षण म्हणजे दहा वर्षांची मुस्लिम समाजातील दीव्यांग रीदा झेहर या चिमुकलीला भगवद्गीतेचे चक्क अठरा अध्याय तोंडपाठ आहेत. या कार्यक्रमात तिचा सन्मान केला जाणार आहे.




तसेच आठ वर्षाची श्रीनगरमध्ये राहणारी ताजमुल इस्लाम सर्वात कमी वयाची असून ती जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन आहे.


 

अवघ्या 17 वर्षांची असलेल्या सुषमा वर्मा हीने एमएससी पूर्ण केले. तसेच आता ती पीएचडी करत आहे. 


सुषमाची 5 वर्षाची छोटी बहीण अन्यन्या वर्मा ही देखील सुपर जिनियस आहे. कारण या चिमुकलीला रामायण तोंडपाठ आहे. तसेच ही पहिलीच्या वयात नववीचं शिक्षण घेत आहे. 

मालावत पूर्णा हीने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे.

मुंबईच्या एका रिक्षा चालकाची मुलगी प्रेमा जयकुमार ही तर चक्क सीए टॉपर असून मनात जिद्द असेल तर मार्ग मिळतात हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे.

या सर्व मुलींनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल षण्मुखानंद सभागृहामध्ये 5 मार्च रोजी त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या