आता पार्ल्यातही घ्या खादीचे कपडे

विले पार्ले - खादीचे कपडे म्हणजे ओल्ड फॅशन हा समज आता दूर होतोय. खादीच्या कपड्यांना मिळणारा प्रतिसादही वाढतो आहे. नुकतंच विले पार्ले येथे खादी आणि ग्रामोद्योग केंद्राच्या खादी इंडिया या साखळीतल्या दुकानाचं उद् घाटन करण्यात आलं. इथे फक्त उत्तम प्रतीचेच नव्हे, तर फॅशनेबल खादीचे कपडेही उपलब्ध होतील. प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू बेरी यांनी डिझाइन केलेले कपडेही तुम्हाला इथे मिळू शकतील. हातमागावर तयार होणाऱ्या सर्वोत्तम वस्त्रांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, असा या केंद्राच्या स्थापनेमागचा हेतू आहे.

अशाच प्रकारची आणखी खादी केंद्रं दिल्ली आणि जयपूरमध्येही तयार करण्यात आली आहेत. त्यांचं उद् घाटनही लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी या केंद्राच्या उद् घाटनप्रसंगी दिली. तर जी व्यक्ती खादीच्या वस्त्राची खरेदी करते, ती गरीबांना मदत करते, असं मत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना या वेळी म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या