आता घरपोच वाचनालय!

तुम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडतात? पण प्रत्येक वेळी पुस्तकांसाठी वाचनालयाच्या फेऱ्या मारायचा कंटाळा येतो? मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आता पायपीट करत वाचनालयात जाऊन पुस्तकं आणण्याची गरज नाही. कारण वाचनालयच आता तुमच्या घरी येणार आहे. पुस्तकांना पाय फुटले की काय?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसं काहीही नाही!

आता ऑनलाइनचा जमाना आहे. तुम्हाला हवी आहेत ती पुस्तकं फक्त एका क्लिकवर घरपोच केली जातील. त्यासाठी तुम्हाला फक्त bigbooks.co.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. इथं तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं आढळतील. ट्रॅव्हल, रोमान्स, हॉरर, थ्रिलर, सायन्स, स्पोर्ट्स, हेल्थ आणि बिझनेस यांवर आधारीत अनेक पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. फक्त एवढंच नाही, तर जुन्या पुस्तकांचा संग्रह देखील तुम्हाला इथं मिळेल. ट्रॅविस मेकगी सिरिज, फिलिप मारलो अशा अनेक जुन्या पुस्तकांचा संग्रह आजही इथे उपलब्ध आहे.

काय आहे या योजनेची खासियत?

तुम्हाला दर महिन्याला फक्त २०० रुपये भरायचे आहेत. या २०० रुपयांमध्ये तुम्ही हवी तेवढी पुस्तकं वाचू शकता आणि कितीही दिवस तुमच्याजवळ ठेवू शकता. याशिवाय तुम्हाला पुस्तकं घरपोच केली जाणार आहेत. पुस्तक परत करताना देखील तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. ते तुमच्या घरी येऊन पुस्तक घेऊन जाणार. त्यांच्याकडे पुस्तकांच्या मूळ प्रती असून सर्व पुस्तकं चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे वाचकांनी देखील पुस्तकं घेतल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, अशी त्यांची अट आहे.

कशा आहेत योजना?

सध्या ते तुम्हाला चार योजनांची ऑफर देत आहेत. त्यापैकी एक म्हणजे डिझायर. यामध्ये तुम्ही एकावेळी एक पुस्तक घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एका महिन्याचे २०० रुपये भरावे लागणार आहेत. तीन पुस्तकांसाठी ५००, चार पुस्तकांसाठी ९५० तर सहा पुस्तकांसाठी १७५० रुपये मोजावे लागणार आहेतत्यांचा दुसरा प्लॅन आहे लव. या प्लॅनमध्ये देखील चार पर्याय आहेत. एकावेळी तुम्ही दोन पुस्तकं निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला ३२५ रूपये महिन्याला भरावे लागतील. तीन पुस्तकांसाठी ८७५ तर सहा पुस्तकांसाठी १७०० रुपये मोजावे लागतील. पॅशन आणि ऑबसेशन हेही त्यांचे दोन प्लॅन आहेत.

कसं कराल सबस्क्राइब?

सबस्क्राइब करण्यासाठी http://www.bigbooks.co.in/user/registration/profile या लिंकवर क्लिक करा.


हेही वाचा

ट्रॅव्हलिंग लायब्ररी! कधी ऐकलं आहात का?

पुढील बातमी
इतर बातम्या