पुस्तक खरेदीसाठी द्यावी लागणार आयक्यु टेस्ट

वांद्रे - आता तुम्हाला पुस्तक खरेदी करण्यासाठी आयक्यु टेस्ट द्यावी लागणार आहे. वांद्र्यातील कर्मा कॉर्नर बुक सेंटरवर पुस्तक खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची आयक्यु टेस्ट घेतली जात आहे. कर्मा कॉर्नर बुक सेंटरमध्ये फक्त आध्यात्मिक पुस्तकं विकली जातात. त्यामुळे अधात्म्याच्या निगडीत पुस्तक खरेदीसाठी येणाऱ्यांना प्रश्न विचारले जातात. त्यानंतरच त्यांना पुस्तके विकली जातात. या बुक सेंटरमध्ये कर्म सूत्र, आत्मा सूत्र, स्वप्न सूत्र, गुरु सूत्र आणि योगा सूत्र उपलब्ध आहेत. या बुक सेंटरमध्ये 50 पेक्षा अधिक पुस्तकं विकण्यासाठी उपलब्ध आहेत. तसंच वाचणाऱ्यांसाठी या बुक सेंटरमध्ये आरामासाठी ही जागा उपलब्ध करुन देण्यात आलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या