कुंभारवाड्याची दुर्गादेवी !

कुंभारवाडा - डोळ्यातील वासल्य. चेहऱ्यावरील तेज. स्मित हास्य. कपाळावर चांदीचा मुकुट. साजश्रृंगार करून नटलेल्या देवीचे हे रूप डोळ्यांचे पारणे फेटतात. देवीच्या डाव्या बाजूस महाकाली आणि उजव्या बाजूलाच शितलादेवी. अशा तीन देवी मंदिरात विराजमान आहेत. दुर्गादेवी हे 250 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर. या देवीचा उगम समुद्रात झाला, अशी अख्यायिका आहे. तेलगू ट्रस्टचे हे मंदिर आहे. दसऱ्याला आणि पिठोरी आमावस्येला देवीची मिरवणूक काढली जाते. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या धुम-धडाक्यात साजरा न करता पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

पुढील बातमी
इतर बातम्या