वरळीत जागतिक विज्ञान प्रदर्शन

वरळी - सायन्स फॉर ए बेटर लाइफ या बायर कंपनीच्या घोषवाक्यावर आधारीत असणारं मेकिंग सायन्स मेक सेन्स हे जागतिक विज्ञान प्रदर्शन नेहरु सेंंटर मध्ये भरवण्यात आलं आहे. 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण आशिया विभागाचे वरिष्ठ बायर प्रतिनिधी रिचर्ड व्हॅन डेर मेरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध शिक्षण तज्ञ प्रा. मनमोहन शर्मा उपस्थित होते. मेकिंग सायन्स मेकसेन्स हा बायर चा स्वतंत्र शैक्षणिक उपक्रम असून त्यामध्ये प्रात्यक्षिकांद्वारे विज्ञानाचे धडे दिले जातात. त्यामुळेच बायर ग्रुप इन इंडियाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महानगर पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसह इतर शाळेतील मिळून 500 विद्यार्थ्यांनी भेट दिली.

काय आहे प्रदर्शनात

दोन मीटर उंच असणाऱ्या 21 बॉक्सेसचा समावेश आहे. ज्यावर कॅपिटल अक्षर असून त्यातल्या प्रत्येकातून बायरच्या विविध विषयांचा बोध होतो. उदा. ए फॉर अँस्परिन पासून ई फॉर एन्हान्सिग ग्लोबल फूड सिक्युरिटी पासून एस फॉर सायन्स पर्यंत प्रत्येक बॉक्समध्ये बायरच्या विषयांची वैज्ञानिक पार्श्वभूमी आणि सामाजिक पैलू याबाबतची माहिती आणि फोटो आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञानाचे धडे शिकता येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या