आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यान साधनेची गरज

वडाळा - मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अॅण्ड जनरल एम्प्लॉइज युनियन आणि ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियन यांच्या वतीनं चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वडाळा नाडकर्णी पार्क इथं शनिवारी या शिबिराचं आयोजन केलं होतं. सध्याच्या तणावाच्या काळात चांगले आरोग्य, कौटुंबिक सुख, कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी ध्यानसाधनेची नितांत गरज असल्याचं मत मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटिया यांनी व्यक्त केलं. या वेळी मुंबई पोर्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, युनियनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख आणि कामगार उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या