मुंबईत भारतातील पहिलं ‘FUJIFILM House of Photography’ सुरू

मुंबईकरांसाठी फोटोग्राफी आणि इमेजिंग क्षेत्रातील एक खास अनुभव आता उपलब्ध झाला आहे. अंधेरी पश्चिम येथे FUJIFILM House of Photography सुरू करण्यात आलं आहे. हे भारतातील पहिलं आणि जगातील अकरावं असे इमर्सिव्ह फोटोग्राफी आणि इमेजिंग डेस्टिनेशन आहे.

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी, या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, छायाचित्रणाच्या शोधाला 200 वर्षे पूर्ण होत असलेल्या महत्त्वाच्या वर्षात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

तब्बल 5,795 चौरस फूट जागेत आणि दोन मजल्यांवर उभारण्यात आलेल्या या केंद्रात FUJIFILM ची संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टीम एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. नवशिक्या फोटोग्राफर्सपासून व्यावसायिक छायाचित्रकार, फिल्ममेकर्स आणि कंटेंट क्रिएटर्सपर्यंत सर्वांसाठी हे केंद्र तयार करण्यात आलं आहे.

येथे instax™, X Series आणि GFX System कॅमेरे, तसेच QuickSnap™ सिंगल-यूज कॅमेरे आणि बायनॉक्युलर्स यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

भारतात पहिल्यांदाच FUJIFILM च्या ‘Z Series’ प्रोजेक्टर्ससाठी स्वतंत्र एक्सपीरियन्स झोन देखील उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय डिजिटल फोटो कायमस्वरूपी आठवणींमध्ये बदलण्यासाठी प्रीमियम प्रिंटिंग सोल्यूशन्सचाही अनुभव घेता येईल.

केंद्राच्या ग्राउंड फ्लोअरवर हँड्स-ऑन प्रॉडक्ट एक्सपीरियन्स, लाइव्ह instax प्रिंट बार, X Series डिस्कव्हरी टेबल आणि GFX व लेन्स डिस्प्ले ठेवण्यात आला आहे.

तर पहिल्या मजल्यावर क्रिएटिव्ह कम्युनिटी हब, क्युरेटेड फोटो गॅलरी, क्रिएटर स्टुडिओ, वर्कशॉप एरिया, प्रो प्रिंट सेंटर आणि एंटरप्राइज इमेजिंग सोल्यूशन्स उपलब्ध आहेत.

भारतीय पारंपरिक वास्तुकला आणि आर्ट-डेको शैलीपासून प्रेरित या जागेची रचना करण्यात आली आहे. भविष्यात येथे वर्कशॉप्स, प्रदर्शनं, क्रिएटर मीट-अप्स आणि फोटो वॉक्स आयोजित करून फोटोग्राफी समुदायाला एकत्र आणण्याचं उद्दिष्ट आहे.

म्हणजेच, हातात पहिल्यांदा कॅमेरा घेणाऱ्या नवशिक्यापासून अनुभवी प्रोफेशनल फोटोग्राफरपर्यंत प्रत्येकासाठी मुंबईत आता फोटोग्राफी, क्रिएटिव्हिटी आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचं एक नवं हब तयार झालं आहे.


हेही वाचा

बेस्टकडून वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसना मंजुरी

पुढील बातमी
इतर बातम्या