मराठमोळ्या धनश्रीची उंच भरारी

मुंबई - मराठी वाड्मय भारतातील समृद्ध वाड्मयांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मात्र आता मराठी मातीतले लेखक इंग्रजी साहित्याकडे वळले आहेत. यापैकी एक नाव म्हणजे धनश्री कदम. मराठमोळ्या धनश्रीनं वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी 'आय लिव्ह फॉर यू' ही कादंबरी लिहली. आता तिची दुसरी कादंबरी चाहत्यांच्या भेटीला येतेय. या लघुकादंबरीचं नाव आहे 'सुझाना जोन्स'. २३ वर्षीय ख्रिश्चन कॅथलिक सुझाना, एका धनाढ्य हिंदू राजकारण्याचा तरूण मुलगा अभिषेक, माल्कम रिचर्ड डेव्हिस हा तिचा बालपणीचा मित्र. या तिघांच्या मनातील भावनिक घालमेल ‘सुझाना जोन्स’या पुस्तकात मांडण्यात आलीय. ही कादंबरी अमेझॉनवर उपलब्ध असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या