नेहरू सेंटरमध्ये प्रदर्शन

वरळी - जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त नेहरू सेंटरमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलंय. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी 23 वर्षांपासून लहान मुलांच्या कलेवर आधारित प्रदर्शन भरवते. या वर्षीही निवडक अशा 15 विद्यार्थ्यांनी काढलेल्या 50 पेक्षा अधिक चित्रांचा आणि 15 शिल्पांचा प्रदर्शनात समावेश आहे. तर 6 ते 14 वयोगटातील मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात ठेवण्यात आलेली शिल्पं फक्त पाहण्यासाठी असतील, तर चित्रं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या चित्रांच्या किंमती हजारापासून ते दीड हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये सहभागी विद्यार्थी मुंबई आणि नाशिक येथील शाळांमधून निवडलेले आहेत. यासह रशियन मुलांनी काढलेले चित्रही प्रदर्शनात मांडण्यात आलंय. हे प्रदर्शन 14 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत खुलं राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या