चित्रकार रायबांच्या कलाकृतीचं नेहरू सेंटरमध्ये प्रदर्शन

वरळी- प्रसिद्ध चित्रकार अब्दुल अझीझ रायबा यांच्या 154 कलाकृतींचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आलं आहे. 1958 साली रायबा कश्मीरला होते. त्यावेळी कश्मीरच्या कलेवर आणि संस्कृतीवर आधारीत चित्रे त्यांनी रेखाटली होती. त्या चित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. तर रायबांनी तागाच्या कपड्यावर प्रक्रिया करून रेखाटलेली चित्रेही यामध्ये मांडण्यात आली आहेत. अब्दुल रायबा यांच्या मुलाने त्यांच्या या कलाकृतींच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. 1 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिक प्रेक्षकांना हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या