'रुईया'त ट्रेडिशनल डे साजरा

माटुंगा - येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात शनिवारी 'पारंपरिक दिवस' म्हणजेच ट्रेडिशनल डे साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक अशी वेषभूशा परिधान केली होती. गुजराती,  दक्षिण भारतीय, वेस्टर्न तसेच मराठमोळी अशी वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे त्याच उत्साहात ट्रेडिशनल डे साजरा केला. त्याचबरोबर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगुळ घ्या गोड-गोड बोला या शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद देखील विद्यार्थ्यांनी लूटला.

पुढील बातमी
इतर बातम्या