धारावी - कलानगर द्रुतगती मार्गावर रविवारी ‘माणुसकीची भिंत’ या नव्या संकल्पनेतून स्ट्रीट स्टोर्स उभारण्यात आले. या अनोख्या संकल्पनेतून आयडीबीआय फेडरल इनशॉरन्स आणि लिओ क्लबच्या वतीने शेकडो गरीब गरजूंना मोफत कपडे,
"या आवाहनात कोणावरही स्वच्छ कपडे आणून देण्याचे बंधन टाकण्यात आले नाही. मळलेले कपडे, चप्पल, बूट स्वीकारले जातील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमच्या आवाहनाला मुबंईकरांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो जोड लहानमुलांचे तसेच महिला, पुरुषांचे कपडे, चप्पल बूट जमा झाले. सदरील सर्व कपडे एकत्र करून लॉड्रित धुवून इस्त्री करण्यात आले. तसेच फाटलेले कपडे रफू करून ‘स्ट्रीट स्टोर्स’च्या भिंतीवर टांगण्यात आले आहे. हा आमचा पहिला प्रयोग असून प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईसह इतर भागात ही संकल्पना राबवण्याचा मानस आहे,"
- कार्तिक रमण, चीफ मार्केटिंग ऑफिसर, आयडीबीआय फेडरल