पुस्तकं वाचायला आवडतात? मग 'या' प्रदर्शनाला भेट द्या

तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात? मग तुमच्यासाठीच वरळीमध्ये सेकेंड हँड पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अनेकदा तुम्हाला एखादं पुस्तक हवं असतं. पण कुठेच ते पुस्तक उपलब्ध नसतं. मग अशा पुस्तक प्रेमींसाठी हे पुस्तकांचं प्रदर्शन नक्कीच उपयोगी ठरेल. कारण या सेकेंडहँड पुस्तक प्रदर्शनात तुम्हाला जुनी पुस्तकं देखील मिळतील.

मुंबईतल्या काही पुस्तक क्लब्सनी एकत्र येत या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. 20 जुलै ते 24 जुलै असे पाच दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शना अंतर्गत वेगवेगळ्या देशातील विविध पुस्तकं तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

मुंबईच्या इतिहासापासून ते भूगोल विषयावर आधारित सर्व पुस्तक तुम्हाला या प्रदर्शनात मिळणार आहेत. फक्त एवढंच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, कादंबऱ्या अशा विषयांवरील पुस्तकांचा खजिना इथं पाहायला मिळणार आहे. जुनी आणि अशी पुस्तकं जी तुम्हाला कुठे सापडली नसतील. विशेष म्हणजे इथं सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला कमी किमतीत घेता येतील. त्यामुळे तुम्ही एक नाही तर पाहिजे तेवढी पुस्तकं घेऊ शकता.

कुठे : कोवर्कस, बिर्ला सॅन्चूरी मिल कंपाऊंड, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी

कधी : 20 जुलै ते 24 जुलै

पुढील बातमी
इतर बातम्या