मारो घागरो जो घुमियो !

घेर घार घागरो, लछेदार चुंदडी... सध्या असेच घागरे, चुंदडी मुंबई बाजारात पाहायला मिळत आहेत. रंगीबेरंगी, जरीकाम केलेले, कुंदन, घुंगरू, मणी, डायमंड, शिंपले, कवडी, काचा लावलेले घागरे तुम्ही पाहाताय ना... हे घागरे सध्या मुलींसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. पारंपरिक घागरा ओढणीबरोबरच नव्या डिझायनर आणि ट्रेण्डी लूक असलेल्या वजनदार घागरा चोलींना जबरदस्त मागणी आहे. कॉटन, शिफॉन, आणि पारंपरिक बांधणीच्या कपड्यांमध्ये घागरा चोली बाजारात उपलब्ध आहेत. नवरात्रीत कपड्यांच्या बाबतीत पुरुष मंडळीही काही मागे नाहित. पुरुषांसाठी केडिया, धोती, पटियाला असे प्रकारही पाहायला मिळत आहेत. हे तर कपड्यांचं झालं. आता या कपड्यांवर मॅचिंग टिपऱ्या पण हव्याच की. बाजारात अॅल्युमिनियमच्या टिपऱ्यांना जास्त मागणी आहे. लाल, हिरवा, पिवळा, मोरपिशी, निळा, केशरी, गुलाबी अशा मल्टी कलरमध्ये टिपऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. टिपऱ्यांवर वेगवेगळ्या रंगाचे, प्रकाराचे लटकन, मोती, खडे. लच्छांचा वापर केल्यानं थोडा हटके लूक येतो. या टिपऱ्यांची किंमत 70 ते 200 रुपये इतकी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या