सोशल मीडियावर अपहरण?

नालासोपारा - तरुणाईत सोशल मीडियाचं प्रचंड वेड आहे. सोशल मीडियामुळे एक व्यक्ती अनेकांशी जोडला जातो. परंतु याचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, दिलीप कुमार अशा कित्येक दिग्गजांना या सोशल मीडियाने जिवंतपणीच वैकुंठात धाडले होते. अनेक प्रकारच्या अफवांना सोशल मीडियावर ऊत येतो. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसतेय. 

ऐन दहावीच्या परीक्षा सुरू असताना नालासोपारा येथून एका दहावीच्या मुलीचे अपहरण झाल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवली जात आहे. यात कहर म्हणजे या मेसेजसोबत एका शाळकरी मुलीचा फोटोदेखील व्हायरल झालाय. परंतु ही अफवाच असल्याचं नालासोपारा पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलंय. दहावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरवण्याचं काम काही समाज कंटकांकडून केलं जातंय. अशा समाज कंटकांना कायद्याचा चाप बसणे अत्यंत गरजेचे आहे. 

'हे असले प्रकार बदलाच्या भावनेतून विशिष्ट अशा व्यक्तींबाबत जाणीवपूर्वक केले जातात, जेणेकरून त्यांना याचा त्रास व्हावा आणि सोशल मीडियाला हे ठाऊक असतं की हे नक्की कुठून सुरू झालं, परंतु तरीही अशा समाज कंटकांवर सोशल मीडियाद्वारे कारवाई केली जात नाहीये ही मोठी खंत आह' असे मत सायबर क्राईमतज्ज्ञ विजय मुखी यांनी व्यक्त केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या