मुंबई - एव्हरी डॉग हॅज इट्स डे, हे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पण याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला 'डॉग्ज डे आऊट' या इव्हेंटमध्ये मिळणार आहे. ९ एप्रिलला मालाडच्या इनऑरबिट मॉलमध्ये संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान हा इव्हेंट आयोजित करण्यात आलाय. या इव्हेंटची खासियत म्हणजे येथे होणाऱ्या १३ स्पर्धांमध्ये श्वान ओनर आपापल्या डॉगसोबत सहभागी होऊ शकतात.
बेस्ट इन शो, बेस्ट पपी इन शो, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, कूलेस्ट डॉग अशा अनेक स्पर्धा इथे होणार आहेत. यामध्ये ओनर आपापल्या कुत्र्यासोबत रॅम्पवॉक करणार आहेत. विशेष म्हणजे या कुत्र्यांना रॅम्पवॉक आधी तयार केले जाणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या कुत्र्यांची काळजी कशी घेताय किंवा त्याचा सांभाळ योग्य करताय की नाही? याचेही परिक्षण केले जाणार आहे. जो ओनर स्वत:च्या कुत्र्याची चांगली काळजी घेतो त्याला अवॉर्ड देण्यात येणार आहे.
पाळीव कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आणि घरातील एक सदस्य असतो. पण आता कुत्रा हा फक्त घराचे रक्षण करणारा प्राणी राहिलेला नाही. तो खऱ्या अर्थाने माणसाचा मूक साथीदार झालाय. सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात श्वान हा आपला प्राणी मित्र म्हणून वावरत असतो असेच म्हणावे लागेल.