World Health Day : निरोगी आरोग्यासाठी ९ सोप्या गोष्टी

01/10
खाली दिलेल्या ९ गोष्टी अमलात आणाल तर आरोग्य उत्तम राहिल
02/10
आहारात ताज्या भाज्यांचा समावेश असावा : आहारात सलाडचा समावेश असावा. भाज्यांनी भरलेली रंगीबेरंगी प्लेट फक्त छान दिसत नाही. परंतु पौष्टिक पदार्थांनी देखील भरली आहे. लाल पदार्थ उच्च रक्तदाब कमी करण्याचे प्रमाण कमी करतात. तर निळे आणि जांभळे पदार्थ आपल्या स्मरणशक्तीला चालना देतात.
03/10
दिवसाला १२ ते १४ ग्लास पाणी प्यावे : शरीराच्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यक्ता असते. स्वत:ला निरोगी आणि हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.
04/10
उन्हात १५ मिनिटं उभे राहा : सकाळच्या कोवळ्या उन्हात १५ मिनिटं उभं राहणं आरोग्यासाठी चांगलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सूर्य हा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे. जो आपल्याला मानसिक तसंच शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे.
05/10
चालण्यासारखा दुसरा व्यायामप्रकार नाही : फिटनेस बँडमध्ये गुंतवणूक करा किंवा आपल्या दररोजच्या चालण्याची नोंद करण्यासाठी अॅसप वापरा. १०,००० पावलं किंवा त्याहून अधिक चालण्याचा प्रयत्न करा. जवळपास १ तास चालणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
06/10
१५ मिनिटं मेडिटेशन करा : आपलं मानसिक आरोग्य टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीतून १५ मिनिटं काढून मेडिटेशन करणं.
07/10
शरीराला व्यायामाची आवश्यक्ता : चालण्याव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कार्डिओ व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम करणं उत्तमच. आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस काही नृत्य, योग, सायकलिंग हे व्यायाम करावेत.
08/10
टीव्ही, मोबाई, लॅपटॉपचा वापर कमी करा : बर्यालच काळासाठी स्क्रीन पाहणं आपल्या दृष्टीक्षेपावर परिणाम करू शकतं. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतं. याचाच परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर पडू शकतो. झोपण्यापूर्वी कमीतकमी ३० मिनिटांपूर्वी टीव्ही, स्क्रिन, मोबाईलचा वापर टाळावा.
09/10
डोळ्यांवरील ताण कमी करा : दिवसभर लॉपटॉप आणि मोबाईलमुळे डोळ्यांवर ताण पडतो. आपल्या डोळ्यांना थोडा विसावा देण्यासाठी २०-२०-२० नियम पाळा. दर २० मिनिटांनी २० सेकंदांकरिता २० फूट अंतरावर पाहा. यासोबतच एका जागी बसून न राहता दर अर्धा तासानं हालचाल करा.
10/10
७ ते ८ तास झोप आवश्यक : चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कमीतकमी ७ ते ८ तास झोप घेणं महत्त्वाचं आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या