विधानसभा निवडणूक 2024

Updated: Fri, 22 Nov 2024 10:02:23 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधीत प्रत्येक बातमी, मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत आणि तुमच्या विधानसभा मतदारसंघाची प्रत्येक माहिती एका क्लिकवर...

Live Updates

मातोश्रीच्या अंगणात मनसेचा ट्विस्ट, नारायण राणेंना पाडणाऱ्या माजी आमदाराला तिकीट जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. वांद्रे पूर्वच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना मनसेने तिकीट दिलं आहे. त्यामुळे वांद्रे पूर्वेला तिरंगी लढत होणार आहे.

ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व येथून आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी मैदानात उतरले आहेत. आता मनसेनेही इथल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट देत मोठी खेळी खेळली आहे.

29 Oct - 05:17 PM
कल्याण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मतदारसंघाकडे काँग्रेस नेतृत्वाचे लक्ष नसल्यामुळे काही सदस्य असमाधानी आहेत. या 100 ते 125 सदस्यांसह कल्याणमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.

कल्याणमधील एक नेते सचिन पोटे म्हणाले, “आम्ही मुंबईला जाऊन नाना पटोले यांना भेटून राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाच्या चर्चेदरम्यान, महाविकास आघाडीतील भागीदारांनी काँग्रेसच्या हिताचा विचार केला नाही.

ठाणे जिल्ह्यातील एकूण 18  जागांपैकी भिवंडी पश्चिमेला दयानंद चोरघे आणि मीराभाईंदर ते मुझफ्फर हुसेन या दोनच जागा पक्षाला देण्यात आल्या आहेत. यामुळे कल्याण आणि ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम अशा दोन जादा जागांची मागणी कल्याण काँग्रेस नेते करत आहेत. “राष्ट्रवादी (एसपी) नेते कादंबरी साळवे यांनी आमच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावर पक्ष मजबूत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप केला आहे.

28 Oct - 03:31 PM
अमित ठाकरेंना वाटते ‘या’ गोष्टीची धाकधूक

मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी माहीम व वरळी या मतदारसंघांची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या मतदारसंघांमध्ये ठाकरे घराण्याची तिसरी पिढी अर्थात अनुक्रमे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे राजकीय वर्तुळात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

त्यामुळे त्यांची उमेदवारी व त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज माहीम विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका करतानाच अमित ठाकरेंनी इतरही मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरं दिली.

माध्यम प्रतिनिधींनी अर्ज भरतेवेळी धाकधूक वाटते का? अशी विचारणा केली असता त्यावर अमित ठाकरेंनी मिश्किल शब्दांत उत्तर दिलं. “मला अर्ज भरताना धाकधूक वाटत नाही. मला या गोष्टी आवडतात. तुम्ही चालायला मला बोललात तर मला ते आवडतं. पण तुम्ही बाईट द्यायला विचारलंत तर माझी धाकधूक वाढते”, असं अमित ठाकरे म्हणाले.

28 Oct - 03:23 PM
आदित्य ठाकरेंची एकूण मालमत्ता 23 कोटी

2019 साली पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांपूर्वी वैयक्तिक एकूण मालमत्ता 17 कोटी 69 लाख रुपये होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण वैयक्तिक मालमत्ता 23 कोटी 43 लाख इतकी आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाखांची आहे. तर जंगम मालमत्ता 17 कोटी 39 लाख इतकी आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी गेल्या 5 वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीमध्ये 6 कोटींची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी विधि शाखेची पदवी घेतल्याचंही प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

एकूण मालमत्ता – 23 कोटी 43 लाख (2019 मध्ये 17 कोटी 69 लाख)

स्थावर – 6 कोटी 4 लाख

जंगम – 17 कोटी 39 लाख

गुन्हे नोंद – जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल

शिक्षण – विधि शाखेची पदवी

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..

28 Oct - 03:14 PM
उमेदवारीवरून महायुती-महाविकास आघाडीत मोठा संघर्ष

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी (candidates) अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष संपलेला नाही. 

दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुरू आहे. महायुतीतील जागावाटपाची चुरस सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सामंजस्यही चव्हाट्यावर आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत असली तरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे. महायुतीतील फूट मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.

भाजप , शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) किती जागा लढवणार हे अद्याप जाहीर झालेले नाही.

पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..

28 Oct - 03:09 PM
राजीव पाटील यांची निवडणुकीतून माघार

राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि पक्षातील दोन क्रमांकाचे नेते आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी बविआची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे वसई विरारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

राजीव पाटील यांनी भाजपाच्या कार्यक्रमांत देखील हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. यामुळे बहुजन विकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र शनिवारी सकाळी राजीव पाटील यांनी मी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करत या वादावर पडदा टाकला आहे. आईने धरलेला अबोला आणि पक्षाशी असलेले भावनिक नाते यामुळे त्यांनी माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला निवडणुक लढवायची नाही असा निरोपही त्यांनी भाजप पक्षाला दिला.

21 Oct - 05:01 PM