चॉकलेट बॉय साकारणार खलनायकाची भूमिका

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. रणांगण चित्रपटात स्वप्नील जोशी खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटात या कलाकारांची फौज

रणांगण या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत. या दोघांबरोबरच सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे अशी दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. बाप-मुलाला एकमेकांविरोधात उभं करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे.

नेहमीच रोमँटिक भूमिका साकारून तरुणींच्या मनात घर करणारा अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमात पहिल्यांदाच खल-नायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चॉकेलट बॉय स्वप्नील आता प्रेक्षकांना खलनायक म्हणून आवडतो का हे लवकरच कळेल.

पुढील बातमी
इतर बातम्या