आदिनाथ माधुरीसोबत करणार स्क्रिन शेअर!

मराठीमधील चॉकलेट बॉय आदीनाथ कोठारेचे जर तुम्ही फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकर तुमचा आदी धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत काम करताना दिसणार आहे. स्वतः आदीनेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

 

आदीनाथने माधुरी सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने एक सुंदर कॅपशनही दिलं आहे. समथिंग न्यू आणि वर्किंग विथ लिजन्ड असा हॅशटॅग त्याने वापरला आहे. मात्र त्याने हा कोणता चित्रपट आहे. त्यात कोण कोण कलाकार आहेत? याबाबत अद्याप गुप्तता पाळली आहे.

नुकतेच माधुरीचे बकेट लिस्टचं शूटिंग पूर्ण झालं आहे. बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे माधुरी लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय माधुरी एका नव्या रुपात आपल्याला दिसणार आहे. बकेट लिस्टनंतर माधुरी आपल्याला निर्मितीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती '15 ऑगस्ट' या सिनेमाची निर्मिती करत आहे. मराठीमधील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना या चित्रपटात दिसतील.

आदिनाथने छकुला या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने झपाटलेला 2, दुभंग यासारखे चित्रपट तर 100 डेज या मालिकामधून तो प्रेक्षकांसमोर आला.

पुढील बातमी
इतर बातम्या