अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर

अमेझॉन प्राइम व्हिडिओने सोमवारी त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर लाँच केला आहे. या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर १९ मार्च रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. भारत आणि २४० देशांमधील प्राइम सदस्‍य १९ मार्चपासून फक्‍त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर'पिकासो'चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकतील.

राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे  आणि अश्विनी मुकदाम अभिनीत चित्रपट ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते. शिलादित्‍य बोराद्वारे ( निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग, तसंच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केलं आहे. 

चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून तिने अलिकडील दशकामध्‍ये अनेक उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत. 'पिकासो' हा असाच एक चित्रपट आहे, जो सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल.  

पुढील बातमी
इतर बातम्या