वर्ल्ड डान्स डे निमित्त अमृताला मिळालं खास गिफ्ट

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या राजी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अमृताला तीच्या डॅन्सला एक फॅन भेटला. अमृताचा हा फॅन आहे, बॉलिवूड अभिनेता विकी कौशल. वर्ल्ड डान्स डेच्या दिवशी अमृताची ओळख तिच्या नव्या फॅनबरोबर झाली आहे.

मी आणि विकी ‘राजी’ च्या संहिता वाचनासाठी भेटलो होतो. त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्यावर आमची मैत्री झाली. पटियालाच्या शुटिंगच्यावेळी एकेदिवशी विकीला ‘वाजले की बारा’ हे माझंच गाणं असल्याचा उलगडा झाला. त्याला हे गाणं माहीत होतं, आवडतंही होतं. पण या गाण्यावर मीच डान्स केला आहे, हे माहीत नसल्यानं त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.

- अमृता खानविलकर, अभिनेत्री

अमृता पुढे म्हणाली, 'मला आजही आठवतंय, तो धावतच माझ्याकडे आला. आणि त्याने मला तो माझा फॅन असल्याचं सगळ्यांसमोर सांगितल्यावर मला हसूच फुटलं. विकी कौशल?.... आणि माझा फॅन?... खरं तर मसान चित्रपट पाहून मी त्याची फॅन झाले होते... पण विकीसुद्धा तेवढ्यावरच थांबला नाही. त्यादिवशी आमचं शुटिंग संपल्यावर रात्री ‘वाजले की बारा’ गाण्यावर आम्ही दोघंही खूप नाचलो.

दरवर्षी अांतरराष्ट्रीय नृत्य दिवशी माझ्या आवडत्या डान्सरबद्दल मला विचारलं जातं. पण यंदाच्या ‘डान्स डे’ला मी फिल्म इंडस्ट्रीमधल्या कोणाची तरी आवडती नर्तिका आहे, याचा मला आनंद वाटतो आहे. आणि अशी शाबासकी मग मला अजून चांगलं काम करायला प्रोत्साहित करते'

पुढील बातमी
इतर बातम्या