'चला हवा येऊ द्या' टीमची जपानवारी

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने रसिकांना कायमच खळखळून हसवलं. या कार्यक्रमानं काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. पण ब्रेकवरून आल्यानंतर पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयारी मात्र जोरदार सुरू आहे. सध्या यातील कलाकार विश्वदौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असतानाही ते तितकीच मजामस्ती करताना दिसत आहेत.

आपल्याला हसवणारे हे हस्यवीर सध्या जपानमध्ये आहेत. जपानला जाण्याआधी कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी अापल्या या जपान टूरची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर श्रेया वेळोवेळी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांबरोबर जपानमध्ये केलेली धम्माल मस्ती इन्स्टाग्रामद्वारे शेअर करत आहे. या फोटोमधून श्रेया जपानमध्ये पूरेपूर आनंद घेत असल्याचं दिसत अाहे. जपानमध्ये या टीमनं एक गाणंही तयार केलं आहे. 

याआधी या ब्रेकमध्ये या टीमनं लंडन आणि पॅरिसची वारी केली आहे. लॅडन आणि पॅरिसमधील कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरला. यावेळी संपूर्ण टीमने पॅरिस आणि लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणांंना भेट दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या