रंगांनी खुललेला 'रणांगण'

पूर्वी चित्रकलेच्या माध्यमातून चित्रपटांच्या पोस्टर्सला एक वेगळेपण मिळत होतं... पुढे बरेचसे बदल सिनेसृष्टीत होत गेले आणि पोस्टर रंगवणाऱ्या हातांची जागा संगणकाने घेतली... सध्या सगळंच आधुनिक झालं आणि या आधुनिकतेमुळे ही कला विस्मरणात गेली आहे. पण आता या कलेला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने रणांगण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तोच नॉस्टॅल्जिआ पुन्हा निर्माण करत आपल्या चित्रपटाचं पोस्टर या रंगांच्या सहाय्याने खुलवलं आहे.

काय आहे पोस्टरमध्ये?

पोस्टर डिझायनर सचिन गुरव यांच्या रंगांनी साकारलेल्या या पोस्टरवर संभ्रमात पडलेले सिद्धार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरे आपल्याला दिसत आहेत. तर स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांच्या डोळ्यातला रोष रणांगणात सुरू होणाऱ्या युद्धाची जाणीव करून देत आहे. या पोस्टरची जमेची बाजू म्हणजे याने निर्माण केलेला एलपीज् च्या युगातला तोच नॉस्टॅल्जिआ...

या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. कॉम्प्युटरच्या युगात लाँच झालेल्या या रंगीत पोस्टरने मोठमोठ्या एलपीज् च्या कव्हर्सची आठवण करून दिलेला रणांगण हा चित्रपट नात्यांची खरी बाजू मांडायला येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

स्वप्नील जोशी साकारणार खलनायक

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणारा स्वप्नील जोशी आता खलनायकाची भूमिका साकारणार आहे. नेहमी गोड भूमिकांमधुन आपल्या समोर आलेल्या स्वप्नीलचा वेगळा लुक प्रेक्षकांसमोर येणार आहे. रणांगण या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत

महागुरू वेगळ्या भूमिकेत

सचिन पिळगावक रणांगणमधून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर एक राजकारणी म्हणून येत आहे. शिक्षणमंत्र्यांची भूमिका ते साकारणार आहेत. आतापर्यंत बालकलाकार ते दिग्दर्शक अशा सगळ्याच भूमिका सचिन पिळगावकर यांनी लिलाया पेलल्या. तितक्याच ताकदिने ते रणांगणातील डावपेच खेळताना दिसतील.

पुढील बातमी
इतर बातम्या