आपल्या चॉकलेटी लुक्सने लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकरच्या प्रेमात धकधक गर्लही पडली आहे. लवकरच सुमेध धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ या सिनेमात दिसणार आहे. माधुरीने ट्वीट करतं सुमेधचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
माधुरी दीक्षित सुमेधविषयी म्हणते, “बकेटलिस्ट चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स नक्कीच प्रेक्षकांना भावेल. आणि त्याने तू कित्ती उत्तम अभिनेता आहेस, हे लोकांसमोर सिद्ध होईल, याचा मला विश्वास आहे. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
खुद्द माधुरी दिक्षीतकडून एवढी वाहवाही मिळाल्यावर सुमेध खूपच खुश झाला आहे. तो म्हणतो, “माधुरी मॅमकडून अशी शाबासकी मिळावी, हे माझ्यासारख्या कोणत्याही नव्या अभिनेत्याचं भाग्यच म्हणावं लागेल. त्यांची जेवढी कारकिर्द आहे, तेवढं माझं वयही नाही. पण त्यांनी सोशल मीडियावर येऊन अशी जाहिरपणे माझी स्तुती करावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
‘व्हेंटिलेटर’ आणि ‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी 'बकेट लिस्ट' ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण चित्रपट असेल.