कोंडाजी फर्जंदचा महापराक्रम दाखवणारा 'फर्जंद'!

‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र, महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद या योद्ध्याने आपल्या जिवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ११मे ला ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. तत्पूर्वी ‘फर्जंद’ चित्रपटाचा पहिला टीझर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.

अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा टीजर

‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या पहिल्या टीझर मधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. त्यातली शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार आहे.

दिगपाल लांजेकरचं दिग्दर्शन

कोंडाजी फर्जंद आणि त्याच्या मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. या धाडसाची गाथा, दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. अनिरबान सरकार यांनी चित्रपटाची निर्माती केली आहे.


हेही वाचा

'या' चित्रपटासाठी अमेय वाघ वाढवतोय वजन!

पुढील बातमी
इतर बातम्या