२० जुलैला प्रदर्शित होणार ‘काय झालं कळंना’

थोडीशी गोंधळलेली, थोडीशी बावरलेली अवस्था प्रत्येक प्रेमवीराची असते. प्रेमात पडलेल्या अशाच प्रेमवीरांची मानसिकता नेमकेपणाने मांडणारा ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटाचा टीझर रिलीज

निर्माते पंकज गुप्ता यांनी ‘काय झालं कळंना’ या रोमँटिक सिनेमाची निर्मिती केली आहे. २० जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे; तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा

‘काय झालं कळंना’ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमकथेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू आणि स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. तर अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे आदी कलाकारांच्याही भूमिका यात आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या