ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यामध्ये हातखंडा असलेले दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. गोवारीकर प्रेक्षकांसमोर आता पानीपतचा इतिहास उलगडणार आहेत. पानीपत या सिनेमासाठी स्टार कास्टपण नुकतीच फायनल करण्यात आली आहे. या सिनेमात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सॅनन आपल्याला दिसणार आहेत.
हा सिनेमा १७६१ मध्ये झालेल्या पानीपतमधील तिसऱ्या युद्धाच्या कथेवर आधारीत आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलं. कृती सॅननने हा पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
अर्जुन कपूर आणि कृती सेनन हे दोघेही पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करत आहेत. त्याचबरोबर संजय दत्त या चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.