अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आजपर्यंत कधीही एकत्रित काम केलं नव्हतं. आता ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुमित आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
दोन मोठे कलाकार एकत्र
मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमितचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. हिंदी मालिकांमध्ये त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन मोठे कलाकार एकत्र आल्याने त्यांची केमेस्ट्री पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे.
नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा
मोहन जोशी आणि सुमित राघवन सुद्धा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत, ऐंशीच्या दशकात एका मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. घर आणि घरातील माणसांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ चित्रपट घराविषयीच्या अनेक रंजक कल्पना आणि भावनाप्रधान घटनांचा साक्षीदार आहे.
चित्रपटाची कथा...
‘होम स्वीट होम’मध्ये सुमित आणि मृणालसह रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, प्रसाद ओक आदी कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे अभिनेता हृषीकेश जोशी दिग्दर्शनाकडे वळला आहे. चित्रपटाची कथा वैभव जोशी, हृषीकेश जोशी आणि मुग्धा गोडबोले यांची आहे, ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.