असेही एकदा व्हावे...

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहचलेली आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच 'असेही एकदा व्हावे' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यामध्ये ती अभिनेता उमेश कामत बरोबर दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच मोठ्या दिमाखात करण्यात आलं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रत्येत नात्यातील कंगोरे आणि जबाबदारी आपल्यासमोर येणार आहेत.

काय आहे या ट्रेलरमध्ये?

हा ट्रेलर तेजश्रीच्या चाहत्यांसाठी थोडा स्पेशल आहे. कारण ट्रेलरमध्ये तेजश्रीचा वेगळा अंदाज बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये, उमेश आणि तेजश्रीची लव्ह केमिस्ट्री आपणास पाहायला मिळतं. शिवाय आर. जे. च्या भूमिकेत असलेल्या तेजश्रीचा मॉडर्न लूक तिच्या चाहत्यांना नक्की आवडेल. दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये बघायला मिळेल.

शिवाय या दोघांबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे या कलाकारांचीदेखील झलक आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सिनेमाचा मुहूर्त कधी 

या सिनेमाच्या ट्रेलरबरोबरच लाँच करण्यात आलेले 'किती बोलतो आपण' आणि 'सावरे रंग मै' ही दोन गाणीदेखील प्रेक्षकांना नक्की आवडतील. अवधुत गुप्ते यांनी या चित्रपटात एक रोमँटिक गाणं, एक गझल तर एक शास्त्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दर्जेदार ट्रेलरबरोबरच सुमधुर गाण्यांची मैफिलदेखील लोकांना या कार्यक्रमात अनुभवता आली. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या