रेडिओवाणी... आठवणीतल्या गाण्यांची मेजवानी

दादर - तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पडद्याआड गेलेली जुनी गाणी रविवारी संध्याकाळी दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये रेडिओवाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.

दूरचित्रवाणी संचानं कुटुंबातल्या प्रत्येकाचा ताबा घेतला असला, तरीही दोन शतकांपूर्वी जन्माला आलेला ध्वनिप्रयोग अर्थात रेडिओ त्याच्यामुळे नामशेष झालेला नाही, तर तो आजही सर्वांचा मित्र म्हणून सर्वांसोबत आहे आणि विशेषतः संगीत प्रेमींसाठी तर रेडिओचं स्थान जिवलगासारखं आहे.

या रेडिओच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतलं सुवर्णकाळातलं संगीतपर्व गाजवणाऱ्या गुणी परंतु दुर्लक्षित संगीतकारांचा त्यांच्याच लोकप्रिय ठरलेल्या गीतांद्वारे सन्मान ही या कार्यक्रमाची संकल्पना. गिटारवादक प्रदीप दळवी, लेखक संगीतकार रत्नाकर पिळणकर, वास्तुरचनाकार नंदकिशोर कदम आणि किशोरकुमारचे प्रेमी आणि सॅक्सोफोन वादक अशोक मुरकर अशा चार मित्रांनी एकत्र येऊन प्राण प्रॉडक्शन या नावाची संस्था स्थापन केली. जुन्या काळातील गाणी नवनव्या संकल्पनांतून वाद्यवृंद वादक आणि गायकांच्या सहकार्याने रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. रत्नाकर पिळणकर यांनी या संकल्पनेचं लेखन, दिग्दर्शन आणि निवेदनही केलं. संगीतकारांची सर्वोत्कृष्ट गीतं आणि सोबत त्या गीतनिर्मितीचे चटपटीत किस्सेही या कार्यक्रमात सादर करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या