वसंत देसाईंच्या आठवणींना उजाळा

विलेपार्ले - वसंत देसाई यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दीनानाथ सभागृहात ‘घनश्याम सुंदरा’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. आर्ट एन्टरप्रायझेस यांच्यावतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, ‘उठी उठी गोपाळा’ ही गाणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे संकलन आणि सूत्रसंचालन विनीत गोरे यांनी केले तर संगिताची साथ आप्पा वढावकर यांनी दिली. अर्चना गोरे, माधुरी करमरकर, मंदार आपटे, नचिकेत देसाई यांनी संगितबद्ध केलेली गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या