भूमिपूजनाच्या जाहिरातींवर 18 कोटींचा खर्च

मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज स्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर निवडणुका होणार असल्यानं शिवाजी महाराज स्मारक भूमिपूजनाची प्रसिद्धी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी राज्यभरात जवळपास 5 हजार होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत. काँग्रेसकडून याबाबत टीका केली जात आहे. 'एकीकडे जिजाऊच्या स्मारकातील वीज कापण्यात आली असताना दुसरीकडे भाजपा जाहिरातबाजीसाठी 18 कोटींचा खर्च करत आहे हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या