हॉट प्ले बँड वाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवकांना अटक

बीकेसी - भाजप सहसंयोजक असलेल्या कोल्ड प्ले बँड विरोधात हॉट प्ले बँड वाजवणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. वांद्रे पोलिसांनी 20 जणांना अटक करून त्यांची सुटका केली. गरीब लोकांना बँडचा आनंद घेता यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बीकेसीतील सहा रस्त्यांवर मोफत ढोल ताशा वादन केले. भाजप सहसंयोजक असलेल्या या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अँड. निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे बँड वाजवण्यात आले. हे बँड वादन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी करण सिंग, सुनील गिरी, सुनील पालवे, राजेंद्र थोरात यांनी पुढाकार घेतला.

पुढील बातमी
इतर बातम्या