'युतीच्या काळात महापालिकेच्या 38 मराठी शाळा बंद पडल्या'

मुंबई - शिवसेना मराठी माणसासाठी असल्याचा दावा करते, मात्र भाजपा-शिवसेनेच्या काळात पालिकेच्या 38 मराठी शाळा बंद पडल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केला आहे. तसेच मुंबईचा अर्थसंकल्प एका राज्यापेक्षाही जास्त आहे, मात्र मुंबई एक शहर म्हणून सत्ताधाऱ्यांमुळे अपयशी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आता मुंबईकरांनी वेगळा विचार करण्याची गरज असल्याचं म्हणत शशी थरूर यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार टीका केली. थर्ड पार्टी ऑडिटची मागणी काँग्रेस बऱ्याच काळापासून करत आहे. थर्ड पार्टी अॉडिट केल्यावर स्पष्ट होईल की किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय असं म्हणत शिवसेना भाजपाला थरूर यांनी टार्गेट केले. दरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या