जन्मदिन विशेष - बाळासाहेब...एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी ९२वा जन्मदिवस. शिवसैनिकांसाठी तर हा सणच जणू! महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्वत:चा कधीच न मिटणारा ठसा त्यांनी उमटवला. तसा तो सामाजित आणि कला क्षेत्रातील मंडळीवरही! सर्वच क्षेत्रामधील लोक बाळासाहेबांचे मित्र होते.

पुण्यात झाला जन्म

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ मध्ये पुण्यात झाला होता. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार यांनी लोकजनजागृतीची धुरा सांभाळली होती. तोच वारसा बाळासाहेबांकडेही आला. १४ जून १९४८ मध्ये बाळासाहेबांचा विवाह मीनाताई ठाकरे यांच्याशी झाला. बाळासाहेबांना तीन मुलं. बिन्दुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे. १९९६ मध्ये त्यांचा मुलगा बिंदूमाधव आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांचं निधन झालं.

'फ्री प्रेस जर्नल'पासून केली सुरुवात

'फ्री प्रेस जर्नल' या वृत्तपत्रात त्यांनी कार्टूनिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ६० च्या दशकात त्यांनी काढलेले कार्टून 'टाइम्स ऑफ़ इंडिया' या वृत्तपत्रात रविवारी छापून येत. १९६० मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि 'मार्मिक' सुरू केलं. मार्मिक हे शिवसेनेचं पाक्षिक बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध होतं.

१९६६ मध्ये 'शिवसेने'ची केली स्थापना

बाळासाहेब ठाकरे हे वडील प्रबोधनकार यांच्या कार्यशैलीने खूपच प्रभावित होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरा आणि जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत. याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. तोच वारसा पुढे बाळासाहेबांनीही जपला.

एका वर्षात दोन मोठे झटके

१९९६ मध्ये बाळासाहेबांना दोन मोठ्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. २० एप्रिल १९९६ मध्ये बाळासाहेबांचे पुत्र बिंदु माधव यांचं अपघाती निधन झालं. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या पत्नी मीनाताई यांचं हृदयविकाराने निधन झालं.

६ वर्ष त्यांच्या मतदानावर बंदी

स्पष्टवक्तेपणा हा शिवसेनाप्रमुखांच्या नसानसांत भिनलेला होता. त्यांनी अनेक आंदोलने, लढाया खांद्याला खांदा लावून लढल्या. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक लांबून येत. त्यांचा ठाकरी अंदाज आणि कठोर भाषणाने त्यांना संकटात आणलं. निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदान करण्यावर ६ वर्षांची बंदी घातली. २००५ मध्ये ही बंदी हटली.

कधीही कोणाची भेटायला गेले नाहीत

बाळासाहेब ठाकरे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही कोणाला भेटायला गेले नाही. भारतातील प्रत्येक मोठी व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर येई. राजकीय नेत्यांपासून ते अभिनेते आणि मोठमोठे व्यावसायिकही बाळासाहेबांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर येत.

चांदीच्या सिंहासनावर बसण्याची होती आवड

बाळासाहेबांच्या दरबारात विरोधीही हजेरी लावत. बाळासाहेब उघडपणे धमकी देत. तसेच त्यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती. बाळासाहेबांच्या निधनानंतरही त्यांच्या चांदीच्या सिंहासनावर कोणीही बसत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या