चेंबूरमध्ये तामिळ नागरिकांचे आंदोलन

चेंबूर - जल्लीकुट्टीवरून तामिळनाडूत वादंग सुरू आहेत. याचं लोण आता मुंबईत देखील पोहचलं आहे. चेंबूर परिसरात अनेक तामिळ बांधव वास्तव्यास आहेत. त्यांनी देखील जलकुट्टीचा विरोध करत शुक्रवारी शेल कॉलनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी करत जल्लकुट्टीवरील बंदी हटवण्याची मागणी केली.

बैलांना परिवारातील सदस्यांप्रमाणे वागवतो, त्यांचा सण साजरा करतो, त्यावरच पेटानी मागणी केली आणि त्याची शहानिशा न करता न्यायालयाने बंदी घातली. हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया मुंबईतील तामिळ बांधवानी याठिकाणी व्यक्त केली असून ही बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी देखील या वेळी आंदोलकांनी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या