आझाद मैदानात आपचे आंदोलन

आझाद मैदान - आम आदमी पक्ष मुंबई शाखेच्या वतीनं गुरुवारी आझाद मैदानात भारतीय सैनिकांसाठी ओआरओपीच्या मागणीसाठी तसंच हुतात्मा झालेल्या रामकिशन यांच्या कुटुंबियांसोबत ज्या पद्धतीनं वर्तन करण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या वेळी आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन यांनी आरोप केला की, 'मोदी सरकार अगदी आणीबाणी प्रमाणेच विरोधकांचा आवाज दाबू पाहत आहे'. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रामकिशन यांच्या कुटुंबाला भेटू न देता घटनाबाह्य पद्धतीनं अटक केल्यानं आपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या