३३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता: कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना क्लिनचीट

तब्बल ३३० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपातून काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबियांनाही मुंबई सत्र न्यायालयातील 'लाचलुचपत प्रतिबंध न्यायालया' (एसीबी) ने मंगळवारी क्लिनचीट दिली.

कुणाचा समावेश?

यामध्ये कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलासा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ आली असताना कृपाशंकर सिंह यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाल्यानं काँग्रेसच्या गोटात आनंदाची लहर पसरली आहे. कृपाशंकर सिंह लवकरच राजकारणात सक्रिय होतील आणि त्याचा फायदा काँग्रेसला होईल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सबळ पुराव्याअभावी...

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा आरोप कृपाशंकर सिंहसह त्यांच्या कुटुंबावर लावण्यात आला होता. तर याविरोधात एसीबीनं (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) खटला दाखल केला. पण तपास यंत्रणा आरोपपत्रात कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर करू शकली नाही. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांना एसीबी कोर्टानं क्लिनचीट दिली.

काय म्हणालं न्यायालय?

कृपाशंकर सिंह यांची एसीबी कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याने या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांविरोधातही खटला चालवता येणार नाही, असं म्हणतं न्यायालयानं त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.


हेही वाचा-

मुख्यमंत्री वेळ देईनात, 'या' आमदारांचं मंत्रालयापुढे ठिय्या आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या