अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

15 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभवाला सामोरे जावे लागलेले अभिनेते शेखर सुमन यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'हीरामंडी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या शेखर सुमनने पुन्हा राजकारणात पाऊल ठेवले आहे. मंगळवारी भाजप मुख्यालयात विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

 काय म्हणाले शेखर सुमन?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, “मला कालपर्यंत माहित नव्हते की मी आज येथे असेन. आयुष्यात अनेक गोष्टी कळत-नकळत घडत असतात. कधी-कधी तुम्हाला काय करावं हे कळत नाही आणि तुम्हाला वरून दिशा मिळते आणि तुम्ही त्या दिशेने जाता, मी तेच केलं. मी येथे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलो आहे. मला इथे येण्याचा आदेश दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”

फक्त देशाचा विचार करतोय : शेखर सुमन

"प्रभू रामाने जे ठरवले आहे तेच आपल्याला करायचे आहे. माझ्या मनात कोणतेही नकारात्मक विचार नाहीत, मी फक्त देशाचा विचार करतो. बोलणे आणि जे सांगितले आहे ते करणे यात फरक आहे. मी मोठे भाषण देऊ शकतो, पण मी काही केले तरच ते भाषण अर्थपूर्ण होईल,” शेखर सुमन यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले.

15 वर्षांपूर्वी ही निवडणूक लढवली होती

शेखर सुमन यांनी दुसऱ्यांदा राजकारणात प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पटना साहिबमधून निवडणूक लढवली होती, परंतु भाजपचे तत्कालीन उमेदवार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा पराभव केला होता.


हेही वाचा

मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून कोणते उमेदवार निवडणूक लढवत आहेत?

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात

पुढील बातमी
इतर बातम्या