कृषी सचिव कार्यालयाचा आमदार बच्चू कडूंनी घेतला ताबा

मुंबई - ठिबक सिंचन अनुदानाबाबत कृषी विभागाने बच्चू कडू आणि शेतकऱ्यांसोबत मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत ठिबक सिंचन अनुदानाचे 2014-15 आणि 2015-16 पासूनचे सुमारे 256 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आले नसल्याचं विचारण्यात आलं. पण याबाबत कृषी विभाग सचिव विजय कुमार हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी कृषी विभागाचे सचिव विजयकुमार यांचे सचिव कार्यालय ताब्यात घेतले. कृषिप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचं आमदार बच्चू कडू या वेळी म्हणाले. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवणारे आहे असा आरोपही त्यांनी केला.

पुढील बातमी
इतर बातम्या