राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांना विश्वासात न घेता का भाजपला साथ दिली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणत एकच भूकंप झाला. अजित पवारांनी मात्र का भाजपला साथ दिली. याबाबतच्या चर्चांना उधाण आले अजित पवारांनी शरद पवारांशी केलेल्या बंडखोरीची चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली. शिवसेना-काँग्रेस यांच्यातील मतभेद आणि खालील दहा कारणांमुळेच दादांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
त्याच बरोबर केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्याच्या विकासासाठी कामी येईल. शेतकरी, मजूर, कामगारांचे प्रश्न तडीला लावण्यासाठी मदत होऊ शकते. बदलत्या राजकीय स्थितीत काँग्रेस-सेनेसोबत जाणं आत्मघातकी ठरु शकतं. त्यातच अनेक निर्णयावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं अशक्य असल्यामुळे हे सरकार फारकाळ टिकणार नाही. या कारणांमुळे अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत न जाता भाजपला पाठिंबा दिला असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.